State Employees New Update | 40 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासन शुद्धिपत्रक जारी

State Employees New Update:राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकिय तपासणी धोरण.महाराष्ट्र शासन

शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षांपलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर सेवेचे पुर्नविलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबतची एकत्रित

कार्यपध्दती सामान्य प्रशासन विभाग, दि. १०.०६.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आली आहे.

त्यानुसार शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवेचे पुर्नविलोकन करताना काही निकष नमूद केले आहेत.

त्यात शारिरीक क्षमता / प्रकृतिमान तपासणे हा महत्वाचा निकष आहे.

अधिकारी/कर्मचाऱ्यांची शारीरीक क्षमता / प्रकृतिमान योग्य नसल्यास त्याचा शासकिय कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. सीएफआर-१२११/प्र.क्र.२५७/तेरा दिनांक ०७.०२.२०१८ सोबत दिलेल्या कार्यमूल्यमापन अहवालातील नमुन्यातील भाग-३

(प्रतिवेदन अधिकाऱ्यांने लिहावयाचा मूल्यमापन अहवाल) यातील मुद्दा क्र.७ मध्ये प्रकृतीमान (State of Health) यासमोर (उत्कृष्ठ / चांगला/चांगले नाही) अशी वर्गवारी दिलेली आहे.

सबब, प्रतिवेदन अधिकाऱ्याने संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात प्रकृतिमान संदर्भात शेरे लिहिण्यापूर्वी

संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे वैद्यकिय तपासणी अहवाल पाहून शेरे लिहिल्यास ते वास्तविकतेला धरुन राहतील.

त्याअनुषंगाने विभागाच्या दि.०१.१२.१९९८ व दि.३१.०८.२००६ या शासन निर्णयानुसार ४५ अथवा त्यावरील वयोगटातील रु.१२०००-१६५००(जुनी वेतनश्रेणी ३७००-५०००) व त्यावरील

वेतनश्रेणी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी

वैद्यकिय तपासण्या २ वर्षातून एकदा करुन त्याच्या प्रतिपूर्तीची रक्कम रु.५०००/इतक्या रकमेच्या मर्यादेत देय होती.

सदर सुविधा ठराविक एका वेतनश्रेणी व त्यावरील असलेल्या वेतनश्रेणीसाठी असून सदर सुविधा राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल

भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकिय चाचण्या करण्याची सुविधा लागू करावयाची असल्याने निर्णयात सुधारणा करणे किंवा नविन

Hoधोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दि.३१ मार्च, २०२२ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment