job opportunity job opportunities in indian army : नोकरीची संधी भारतीय लष्करातील संधी

इंडियन आर्मी, झोनल रिक्रूटींग ऑफिस, पुणे – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमणदीव आणि दादरा-नगरहवेलीमधील Domicile उमेदवारांची रिक्रूटींग इयर २०२४-२५ करिता ‘शिपाई फार्मा आणि सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट’ पदांवर पुरुष उमेदवारांची भरती.

इंडियन आर्मीझोनल रिक्रूटींग ऑफिसपुणे – महाराष्ट्रगुजरातगोवादमणदीव आणि दादरा-नगरहवेलीमधील Domicile उमेदवारांची रिक्रूटींग इयर २०२४-२५ करिता ‘शिपाई फार्मा आणि सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट’ पदांवर पुरुष उमेदवारांची भरती.

उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी हजर होताना पुढील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन साक्षांकीत प्रतींसह हजर रहावे. (१) ॲडमिट कार्ड, (आकार कमी न करता चांगल्या प्रतीच्या पेपरवर काढलेल्या लेसर पिंटर प्रिंट आऊट्स) (२) फोटोग्राफ – पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काढलेले २० पासपोर्ट साईज रंगीत फोटो तयार ठेवावेत. फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेले नसावेत. (३) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (१० वी/१२ वी/पदवी इ.) उमेदवारांनी ॲडॅप्टॅबिलिटी टेस्टकरिता २ GB डेटा असलेला स्मार्ट फोन घेवून यावयाचे आहे, (४) डोमिसाईल सर्टिफिकेट, (५) जातीचा दाखला (तहसीलदार/ डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी जारी केलेला), (६) धर्माचा दाखला जर जातीच्या दाखल्यावर शिख/ हिंदू/मुस्लीम इ. असा उल्लेख नसल्यास तहसीलदारांनी जारी केलेला धर्माचा दाखला. (७) शेवटच्या संस्थेतील प्रिन्सिपल/हेड मास्तर यांनी जारी केलेले स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट. (८) सरपंच/नगरपालिका यांनी ६ महिन्यांच्या आतील जारी केलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यावर उमेदवाराचा फोटो चिकटविलेला असेल. (९) २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांनी सरपंच/नगरपालिका यांनी गेल्या ६ महिन्यांपर्यंत जारी केलेले अनमॅरिड सर्टिफिकेट. (१०) एसओएस/ एसओईएक्स / एसओडब्ल्यू/ एसओडब्ल्यूडब्ल्यू ( i) सैनिक/माजी सैनिक इ. च्या मुलांसाठी रिलेशनशिप सर्टिफिकेट, ( ii) Appendix- B मधील ॲफिडेविट, (iii) Original Discharge Book. (११) एनसीसी (ए, बी, सी) सर्टिफिकेट आणि गणतंत्र दिवस सर्टिफिकेट (रिपब्लिक डे परेड) (फोटोग्राफसहीत) (१२) गेल्या दोन वर्षभरात मिळविलेले खेळातील नैपुण्य प्रमाणपत्र (किमान जिल्हा/राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील) (१३) ॲफिडेव्हिट – रु. १०/- च्या नॉन-ज्युडिशिअल स्टँप पेपरवर दिलेल्या नमुन्यातील (अपेंडिक्स ‘डी’) नोटरी केलेले ॲफिडेव्हिट. (१४) बोनस मार्कांकरिता सर्टिफिकेट – बोनस गुणांच्या संबंधित सर्व मूळ प्रमाणपत्र/त्यांच्या साक्षांकीत (duly attested) प्रती, (१५) पॅनकार्ड आणि आधारकार्ड (१६) पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट. (१७) सरपंच/नगरसेवक यांनी दिलेला रहिवासाचा दाखला (Residency Proof). (१८) ( i) ट्रायबल उमेदवारांसाठी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे मान्यता असलेले शरीराच्या कोणत्याही भागावर काढलेले टॅटू चालू शकतात.

(उमेदवाराने स्वत: स्वाक्षरी केलेले Appendix l E- I) मधील सर्टिफिकेट आणि Appendix E- II मधील सर्टिफिकेट. ( ii) हाताच्या आतल्या बाजूस ( inner face of forearms) म्हणजेच हाताचे कोपर ( elbow) ते मनगट ( wrist) आणि हाताच्या पंजाच्या मागच्या बाजूस ( dorsal part of hand) असलेले टॅटू चालू शकतात.

उमेदवारांना विशेष सूचना – भरती प्रक्रिया खूप वेळ चालणारी असेल म्हणून उमेदवारांनी पुरेसे खाण्याचे पदार्थ आणि पाणी घेवून रॅलीच्या ठिकाणी यावे. रॅलीसाठी एन्ट्री अॅडमिट कार्डच्या दोन रंगीत प्रती ( www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड कराव्यात.) दाखवूनच प्रवेश करता येईल.

जर कोणा उमेदवाराला स्टेज-२ साठीचे ॲडमिट कार्ड रॅलीच्या अगोदर ५ दिवसांपर्यंत मिळाले नाही तर त्यांनी जवळच्या आर्मी रिक्रूटींग ऑफिसशी संपर्क साधावा. उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी रात्री ००.१५ वाजता हजर रहावयाचे आहे. सकाळी ०४.०० वाजेनंतर योग्य कारण दाखविल्याशिवाय उमेदवारांना रॅलीमध्ये सहभागी होता येणार नाही.

अधिक माहितीसाठी नजिकच्या ARO शी संपर्क साधावा.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नं. ०२०-२६३६०३४९ Headquarters Recruiting Zone, Pune यांचेशी कामकाजाच्या दिवशी ०९.०० ते १३.०० वाजे दरम्यान संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. २२ मार्च २०२४ पर्यंत करावेत. (& gt; Apply/ login JCOl s/ OR Enrolment & gt; Registration

Leave a Comment