ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावली होती. राज्यातले मंत्री, आमदार आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सगळेजण मुख्यमंत्र्यांसमोर आपलं मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो. त्यात एक व्यक्ती अशी होती, ज्यांचा आवाज प्रयत्न करूनही, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नव्हता पण जवळपास वर्षभरानंतर त्याच व्यक्तीच्या आवाजाची दखल एकट्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर राज्यातल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांना घेतली. गर्दीचा भाग असणारी व्यक्ती आज सगळ्या गर्दीचा चेहरा बनली, नुस्ता गर्दीचाच नाही तर मागच्या 40 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा! ही व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील, जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा
समाजाच्या आंदोलनाने सगळ्या राज्याच लक्ष वेधून घेतले. 29 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आंदोलनाला एक सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसांच्या लाठी चार्जमुळे गालबोट लागले आणि फक्त जालन्यातलीच नाही तर राज्यभरातली परिस्थिती चिघळली, आता वातावरण निवळल असलं तरी नेत्यांच्या भेटी आश्वासन त्यामुळे आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर पकडलाय. पण ज्या व्यक्तीमुळे मराठा आरक्षणाचा थंडावलेल्या विषय पुन्हा चर्चेत आला ते मनोज जरांगे पाटील आहेत कोण? त्यांचा इतिहास काय सांगतो आणि ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा कसा बनले पाहुयात या आर्टिकल मध्ये. मनोज जरांगे पाटील मूळचे बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावाचे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरीच्या शोधात जालन्यातल्या अंबड मध्ये आले. तिथे एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली मनोज जरांगे पाटील समाजकार्यातही सक्रिय होते त्यातून त्यांनी राजकारणाची वाट पकडली. काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर कामाचा धडाका बघून त्यांना युवक काँग्रेसचा जालना जिल्हाध्यक्ष पद मिळालं मात्र 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम टोकला, याचं कारण ठरलं जेम्स लेन प्रकरण या प्रकरणात पक्षाने घेतलेली भूमिका मान्य नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या संघटनेने मोर्चे काढले, आंदोलन केली, 2014 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठीच छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चाही चर्चेचा विषय ठरला होता. 2016 मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नगर नारायण गडावर 500 फुटाच्या भगव्या ध्वजाची उभारणी केली, या कार्यक्रमाला वेगवेगळ्या मठाधिपतींनी उपस्थिती लावली होती, पण अशा कार्यक्रमांपेक्षा मनोज जरंगे पाटील चर्चेत येत राहिले त्या आंदोलनांमुळे बारीक शरीरयष्टी, कपाळावर उभं कुंकू आणि गळ्यात भगवा उपरणं घातलेले जरंगे पाटील कित्येक आंदोलनांचा चेहरा बनले 2012-13 मध्ये त्यांनी जायकवाडीच्या डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावं यासाठी आंदोलन केलं. 2016 मध्ये कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर आंदोलनाची हाक दिली, या प्रकरणातल्या आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली होती. ती जरांगे पाटलांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप करण्यात आला, या प्रकरणात चार जणांना अटकही करण्यात आली. मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी त्यांनी मराठवाड्यातल्या गावागावातून कार्यकर्त्यांना एकत्र आणलं आणि मुंबईला नेलं. आरक्षणाचे मागणी लावून धरण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबताना यांनी आपली जमीनही विकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आरक्षणाच्या मुद्द्यान जसा जोर पकडला होता तो नंतरच्या काळात काहीसा ओसरला. समित्या, अहवाल, शासनाचे निर्णय आणि कोर्टाचा निकाल या सगळ्यात पण मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आरक्षणाच्या मुद्द्याला जराही ढील दिली नाही. 2021 ला त्यांनी साष्टापिंपळगाव मध्ये ठिय्या आंदोलन केलं हे, आंदोलन दोन-तीन दिवस नाही तर तब्बल 90 दिवस म्हणजे जवळपास तीन महिने चाललं. जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या, तेव्हा जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले, त्याच वर्षी त्यांही आणखी एक आंदोलन केलं आणि ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं. गोरीगंधारी येथे झालेल्या या आंदोलनात त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पॅटर्न त्यांनी कायम ठेवला. मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत ते अनेक आंदोलनांचा चेहरा ठरले, मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रखरतेन मुद्दे मांडू लागले, आंदोलन शेतकऱ्यांसाठीच असेल किंवा मराठा समाजासाठी त्यांच्यामागे लोकांचं बळ उभा राहू लागलं. मग आलं 2023 वर्ष जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले त्यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे पटलांशी संवाद साधला, मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जातील असा आश्वासन दिले पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. मग आला ऑगस्ट महिना अंबड मध्ये आंदोलनाची हाक दिली आरक्षणाच्या मागणीसाठी शहागडमध्ये जनाआक्रोश मोर्चा काढला त्या मोर्चात कित्येक मराठा बांधव सहभागी झाले पण शासनाच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि मनोज जारांगे पाटलांनी आंदोलनाचा दुसर स्तर उभारलं आमरण उपोषण जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. आजू बाजूच्या गावातून लोक उपशनास्थळी येवू लागले, मात्र एक सप्टेंबरच्या संध्याकाळी या आंदोलनाला वेगळच वळण मिळाल. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असं पोलिसांचं मत होतं, त्याबद्दल त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली होती मात्र आम्ही जरांगे पाटील आणि इतर उपोषणकर्त्यांची खाजगी डॉक्टर कडून तपासणी करून घेऊ अशी भूमिका आंदोलन कर्त्यानी घेतली. अशातच आंदोलन स्थळी झटापट झाली आणि पोलिसांकडून आंदोलन कर्त्यानवर लाठचार्ज झाला. अशी माहिती माध्यमांमधून देण्यात आली, लाठचार्ज झाल्यानंतर अंतरवाली सराटी सकट सगळ्या राज्यातलं वातावरण बदललं मराठा समाजाने ठिक-ठिकाणी बंदची हाक दिली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं, आंदोलकांवर लाठचार्ज झाल्याच्या रात्रीच राजकीय नेत्यांनी आंदोलना स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असे बडे नेते ही मनोज जरांगे पाटलांना भेटले, तर राज्य सरकार कडून नितेश राणे आणि गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. शासन पातळीवर हालचाल सुरू झाली पण मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलन मागे घेणार नाही या जागेवर बसूनच आरक्षण घेऊ असे जाहीरपणे सांगितलं. मराठा क्रांती मोर्चा नंतर काहीशा थंडावलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा आक्रमकपणे बळ दिल्याने मनोज जरांगे पाटील सध्यातरी आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा बनले आहेत.