Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापीत करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका युवकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला आहे.(Pune Hadapsar Crime)

याप्रकरणी हडपसर भागात राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.21) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिपक शंकर गायकवाड Deepak Shankar Gaikwad (वय-35 रा. हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत गोड बोलून तिच्यासोबत जवळीक साधली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. मुलीच्या घरी येऊन दिपक याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, आरोपीने त्याचे लग्न झाल्याचे तरुणीपासून लपवून ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिपक गायकवाड याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Rape Case)

सहकारी महिलेसोबत गैरवर्तन

वानवडी (Wanwadi) : महिलेला ऑफिसमध्ये बोलावून घेत तू मला आवडतेस असे म्हणून अश्लील वर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case).
हा प्रकार 21 जून 2023 ते आजपर्य़ंत टर्फ क्लब हाऊस (Turf Club House Pune) येथे घडला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) उंड्री (Undri) येथे राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीवर
विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
आरोपीने पीडित महिलेला ऑफिसमध्ये बोलावून घेत तिच्या सोबत गैरवर्तन केले.
त्याला नकार दिला असता आरोपीने अश्लील शिवीगाळ करुन कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Join our WhatsApp GroupTelegram, and facebook page 

 

Leave a Comment